• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मांडेखेल -नागपिंपरी येथे मंजूर झालेले सब स्टेशन त्वरित सुरू करा या मागणीसाठी प्रदीप मुंडे यांनी दिले उपविभागीय कार्यकारी अभियंता यांना ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या ठरावासहित दिले निवेदन!

दहा ते पंधरा दिवसात सब स्टेशनच्या कामात सुरुवात करा अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिला तीव्र आंदोलनाचा इशारा!

ND NEWS | परळी वैजनाथ

मांडेखेल -नागपिंपरी ता. परळीवैजनाथ जि.बीड येथे मंजूर असलेले सबस्टेशन त्वरित सुरू करावे या मागणीसाठी आज दिनांक २१ फेब्रुवारी 2023 रोजी नागापूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन परळी महावितरण कार्यालयातील उपविभागीय कार्यकारी अभियंता श्री .अभिजीत राठोड यांना परिसरातील गावातील ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या घेण्यात आलेल्या ठरावासहित निवेदन सादर केले.

होल्टेज अभावी नागापूर परिसरातील मांडेखेल, अस्वल आंबा, नागपिंपरी ,बोधेगाव, कावळ्याचीवाडी, वाघाळा, तडोळी, माळहिवरा आणि सोनहिवरा या गावातील मोटारी (कृषी पंप) चालत नाही त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच या गावातील नळ योजना नागापूर सब स्टेशन वरून असून गावातील नागरिकांना पिण्याचे पाणीही उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागते तसेच या सबस्टेशनसाठी मांडेखेल- नागपिंपरी येथे महावितरण कार्यालयाकडून जमीनही संपादित करण्यात आलेली आहे.

यासंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी उपविभागीय कार्यकारी अभियंत्यास निवेदन दिले यावेळी त्यांनी या परिसरातील शेतकऱ्यांच्या भावना बोलून दाखवल्या तसेच अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. यासंदर्भात अगोदरच बातमी प्रसिद्ध करून वेळोवेळी निवेदने सादर केलेली आहेत मात्र त्याची अजूनही दखल घेतली गेली नाही तसेच महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष होत आहे.यासंदर्भात मुख्य उपकार्यकारी अभियंता श्री. अभिजीत राठोड यांनी निवेदन स्वीकारले आणि यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

सप्टेंबर ते जुलै महिन्यात मोटारी चालत नाही त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले पीक होल्टेज अभावी पदरी पडत नाही. दहा ते पंधरा दिवसात सब स्टेशनच्या कामास सुरुवात झाली नाही तर परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल याची सर्वस्व जबाबदारी महावितरण कार्यालयाची असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनासोबत ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचे ठराव जोडण्यात आले आहेत तसेच याच्या प्रती मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य, मा. अतुल सावे साहेब पालकमंत्री बीड, मा.खा.डॉ.प्रीतम ताई मुंडे, खासदार बीड, मा. धनंजय मुंडे, आमदार परळी विधानसभा मतदारसंघ, मा. जिल्हाधिकारी साहेब बीड, मा.पोलीस अधीक्षक साहेब बीड, मा. मुख्य अभियंता महावितरण कार्यालय लातूर, मा. अधीक्षक महावितरण कार्यालय बीड, माननीय कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय अंबाजोगाई, मा. उपविभागीय कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय परळी वै, मा. पोलीस उपाधीक्षक साहेब कार्यालय अंबाजोगाई, मा. उपजिल्हाधिकारी साहेब कार्यालय परळी वै, मा. तहसीलदार साहेब कार्यालय परळी वै आणि मा. पोलीस निरीक्षक साहेब ग्रामीण पोलीस स्टेशन परळी वैजनाथ यांना ई-मेल द्वारे सादर करण्यात आल्या आहेत.

यावेळी रेशीम नाना कावळे, माणिक सलगर, जगन्नाथ कावळे सरपंच, भागवत सलगर, अच्युत उबाळे, धोंडीराम सलगर,अॅड सुनील सोनपिर, आनंद सलगर, तुकाराम धायगुडे, बळीराम कावळे, भागवत उपाडे, भिवा उपादे अशोक सलगर , यशवंत सलगर, अंगद शिंदे ,भगवान डिगोळे, कुशबा वावळे, मुरलीधर गडदे, अरुण मुंडे, दिगंबर शिंदे, दाजीसाहेब शिंदे, बालासाहेब शिंदे, श्रीकृष्ण नागरगोजे, गोविंद नागरगोजे, भानुदास सलगर, माणिक सलगर, बाळासाहेब घुगे, पवन मुंडे, दामोदर घुगे, उद्धव वावळे ,संभाजी सातभाई, विनोद सटाळे, दौलत ढाकणे ,जगन्नाथ कावळे ,चंद्रकांत कावळे, श्याम मकर, गणेश गिरवलकर, उत्तरेश्वर मुंडे, जीवराज रंजवे, मारुती भोसले, ओम मुंडे आदी सह परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.