• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ग्रामीण पोलिसांच्या नाकावर टिचून आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाची धाडसी कारवाई

ByND NEWS INIDIA

Feb 19, 2023

आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाची धाडसी कारवाई

◼️जिल्हाधिकारी साहेब बीड यांचे दारूबंदीचे आदेश लागू असतानाही मौजे धर्मापुरी येथे सर्रास दारूविक्री

बीड ( प्रतिनिधी ) मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागामध्ये अवैद्य धंदे बोकाळलेले असूनही ग्रामीण भागामध्ये म्हणाव्या तशा कारवाया होत नव्हत्या, अगदी सर्वसामान्य माणसांनाही माहिती होतील अशा अनेक अवैध धंद्यांनी ऊत माजवला होता. परंतु हेच अवैद्य धंदे ग्रामीण पोलिसांना कसे माहीत होत नाहीत यावरती मोठा प्रश्नचिन्ह आहे.
याचाच एक भाग म्हणजे आज दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त माननीय जिल्हाधिकारी साहेब बीड यांचे दारूबंदी आदेश लागू असतानाही मौजे धर्मपुरी तालुका परळी येथील स्वप्निल बियर बार व पवन बियर बार हे उघडे ठेवून अवैध दारू विक्री करीत आहेत व तसेच त्याचेच बाजूला एक गोविंद केंद्रे इसम गुटखा विक्री करीत आहे माहिती मिळाल्यावर सदरची माहिती त्यांचे पथकातील अंमलदार व पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण पीएसआय केंद्रे यांना देऊन सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पीएसआय विठ्ठल केंद्रे व केज एचडीपीओ कार्यालयातील अमलदार व एसडीपीओ कार्यालय अंबाजोगाई येथील अमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन स्वप्निल बिअर बार व पवन बियर बार ठिकाणी छापे मारून स्वप्नील बियर बार मधील मॅनेजर इसम रमेश बाबुराव मस्केरा रा.ऊजणी यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 34,535 रुपयाचा माल ताब्यात घेतला तसेच पवन बार येथील मॅनेजर महादेव बलभीम तारसे रा.धर्मापुरी यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 13,095 रुपयांचा माल ताब्यात घेतला तसेच हॉटेल गोविंदाचे बाजूला किराणा दुकानदार गोविंद ज्ञानोबा केंद्रे याच्या ताब्यातून गोवा गुटख्याचा माल व नगदी असे एकूण 54,054 रुपयाचा माल जप्त करून दारूबंदीच्या दोन व गुटख्याची एक तीन कारवाया अशा फिर्यादी वरून पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे गुन्हे नोंद झाले आहेत, एकूण 1,01,684 रुपयांचा मुद्देमालासह सदरची कारवाई मा.पोलिस अधीक्षक साहेब बीड सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे साहेब फौजदार बालासाहेब फड ,बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे ,मुकेश खरटमोल ,अशोक खेलबुडे ,सतीश कांगणे यांनी केली आहे.