• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केंद्र सरकारचा ‘प्रोजेक्ट चित्ता’ पहा काय आहे हा प्रोजेक्ट ?

केंद्र सरकारचा ‘प्रोजेक्ट चित्ता’ पहा के आहे हा प्रोजेक्ट

भारतात 12 चित्ते भारतात दाखल होणार
कुनो राष्ट्रीय उद्यानातील तयारी पूर्ण

ND NEWS |

दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) आज (18 फेब्रुवारी) 12 चित्ते भारतात पोहोचणार आहेत.नामीबियामधून (Namibia) 12 चित्ते भारतासाठी रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, “यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून शुक्रवारी 12 चित्ते रवाना झाले असून ते शनिवारी भारतात दाखल होतील.” ही दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांची भारतात येणारी दुसरी खेप आहे. याआधी आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत.
12 चित्ते भारतात दाखल होणार

दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात आणले जात आहेत. हे चित्ते आज भारतात पोहोचतील. भारतीय हवाई दलाच्या Galaxy Globemaster C17 वर 12 चित्ते देशात आणले जात आहेत. हे विमान आज सकाळी 10 वाजता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला पोहोचण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत सरकारकडून प्रोजेक्ट चित्ता मिशन राबवलं जात आहे.

केंद्र सरकारचा ‘प्रोजेक्ट चित्ता’

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, “आपला पर्यावरणीय समतोल पूर्ववत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेतील 12 चित्त्यांनी भारतात प्रवास सुरु केला आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान शनिवारी त्यांना मायदेशी आणणार आहे. चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात येणार आहे.” दरम्यान, ही चित्त्यांची दुसरी खेप आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर 2022 रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना सोडण्यात आले होते.