• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अ.पो. अधीक्षक कविता नेरकर यांची पत्त्याच्या क्लब वर धाड टाकून 69,650/ रुपयाचा मुद्देमाल जप्त

अ.पो. अधीक्षक कविता नेरकर यांची पत्त्याच्या क्लब वर धाड टाकून 69,650/ रुपयाचा मुद्देमाल जप्त

केज प्रतिनिधी | 

अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची केज तालुक्यातील कोरडेवाडी मध्ये पत्त्याच्या क्लब वर धाड टाकून 69,650/ रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, केज पोलीस स्टेशन अंतर्गत कोरडेवाडी येथे पत्याचा क्लब चालू आहे. त्यावरून त्यांनी त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शिंगाडे व त्यांच्यासोबत संजय राठोड, अनिल दौंड, तानाजी तागड व महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वंदना गायकवाड, रामेश्वर सुरवसे यांना आदेश दिल्यावरून टीमने दुपारी चार वाजता सदर ठिकाणी छापा मारला असता काही इसम गोल रिंगण करून तिर्रट नावाचा जुगार खेळवत व खेळत असताना मिळून आले. सदरील ठिकाणी रामभाऊ जयवंत शिंदे, भगवान सिताराम कोरडे, केशव मारुती शिंदे, महिंद्रा सोपानराव यादव, आश्रुबा सुखदेव यादव, मधुकर अंबादास परळकर, रामकिसन निवृत्ती यादव हे जागीच मिळून आले. तर गंगाधर जयवंतराव शिंदे, दत्ता मधुकर कोरडे व दत्ता सुग्रीव गीते सर्व राहणार कोरडेवाडी हे पळून गेले.
दरम्यान, वरील दहा लोकां विरोधात रामेश्वर श्रीराम सुरवसे यांच्या फिर्यादी वरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.