• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

उपोषणाचे इशारा दिला आणि सरकार कामाला लागले: सुभाष बसवेकर

ByND NEWS INIDIA

Feb 7, 2023

◼️उपोषणाचे इशारा दिला आणि सरकार कामाला लागले: सुभाष बसवेकर

◼️कार्यकर्ते एकत्र व संघटित झाले की सरकारला झुकावेच लागते: सुभाष बसवेकर

 

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन च्या वतीने माहिती आयुक्तांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात यासाठी मुख्यमंत्री आणि सचिव सामान्य प्रशासन विभाग याना आपण तीन नोव्हेंबर 2022 रोजी निवेदन दिले होते.
तसेच 31 जानेवारी 2023 रोजी पुन्हा एक पत्र दिले होते. त्यात माहिती आयुक्तांची पदे तातडीने व कालबद्ध कार्यक्रम राबवून लवकरात लवकर भरावीत अन्यथा 28 फेब्रुवारी 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्ते उपोषण व धरणे आंदोलन करतील. असा इशारा दिला होता.
सामान्य प्रशासन विभागाने आपल्या उपोषण व धरणे आंदोलन इशाऱ्याची दखल घेतली व आज 7 फेब्रुवारी 2023 रोजी माहिती आयुक्तांच्या तीन जागा भरण्यासाठी जाहिरात काढली.
हे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन च्या संघटित शक्तीचे यश आहे.
आपल्या आणखी बऱ्याच मागण्या आहेत. त्यासाठी 28 फेब्रुवारी 2023 रोजी पासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषण व धरणे आंदोलन तर होणारच आहे. त्या संबंधी सविस्तर माहिती स्वतंत्र पोस्ट करून दिली जाईल.

हे एक विजयाचे पाऊल आहे. आणखी खूप प्रवास करायचा आहे.
लढेंगे ! जितेंगे !!