• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लेंडेवाडी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक स्थळांना भेटी शैक्षणिक सहलीने विद्यार्थी आनंदले, पालकही झाले समाधानी

ByND NEWS INIDIA

Feb 5, 2023

लेंडेवाडी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक स्थळांना भेटी

शैक्षणिक सहलीने विद्यार्थी आनंदले, पालकही झाले समाधानी

शितलकुमार रोडे : परळी वैजनाथ बीड

सविस्तर वृत्त: लेंडेवाडी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. यात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. सहलीमुळे विद्यार्थ्यांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर आश्रम शाळेने सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मेजवानी दिल्याने पालकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.
लेंडेवाडी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली. शाळेचे अध्यक्ष जिवनराव राठोड यांनी शुभेच्छा दिल्यानंतर सहल मार्गस्थ झाली. श्री क्षेत्र तुळजापूर, कोल्हापूर, पन्हाळगड किल्ला, श्री महालक्ष्मी, कन्हेरीमठ, शाहू पॅलेस, पंढरपूर, शिखर शिंगणापूर आदी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. ऐतिहासिक घटना समजून घेऊन धार्मिक महत्त्वही समजून घेतले. यात ऐतिहासिक वास्तू, गड – किल्ले आदी स्थळे पाहता आल्याने विद्यार्थी आनंदी झालेले दिसत होते. यामुळे पालकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.
सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी लेंडेवाडी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक सर्वश्री विजय राठोड, बिराजदार, सुडे, मादाळे, कांदे, चव्हाण, सुभाष राठोड, चंदनशिवे, डुमने आदींनी विशेष परिश्रम घेतले.