• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची संपूर्ण माहिती: नितीन एस ढाकणे

ByND NEWS INIDIA

Feb 5, 2023

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची संपूर्ण माहिती: नितीन एस  ढाकणे

महाडीबीटी अंतर्गत शेतकरी शेतकरी पोर्टलवर शेतकरी योजना 2023 करिता नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना सर्व योजनांचा लाभ एकाच पोर्टलच्या माध्यमातून मिळवता यावा याकरिता MahaDbt शेतकरी पोर्टल हे सुरू करण्यात आलेले आहे. या पोर्टलच्या अंतर्गत विविध प्रकारचे योजना राबविण्यात येत आहेत.

सविस्तर वृत्त :
पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनीएक वेळेस अर्ज केल्यानंतर तो अर्ज शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळे पर्यंत लागू असतो
महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांनी एखाद्या योजने करिता सन 2022 मध्ये अर्ज केला तर त्या शेतकऱ्याची त्यावर्षी निवड न झाल्यास पुढच्या वर्षी करिता तो अर्ज पात्र ठरतो आणि शेतकऱ्याला पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्याकरिता महत्त्वपूर्ण असे हे महाडीबीटी शेतकरी पोर्टल आहे.

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

1. ट्रॅक्टर योजना
2. ट्रॅक्टर चलीत अवजारे
3. पॉवर टिलर
4. पंपसंच
5. मका सोलणी यंत्र
6. ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेअर
7. कॉटन श्रेडर
8. रीपर
9. ड्रॅगन फ्रुट
10. मशरूम उत्पादन प्रकल्प
11. मसाला पीक
12. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
13. सामूहिक शेततळे
14. शेततळे अस्तरीकरण
15. हरितगृह /शेडनेट हाऊस
16. मधुमक्षिका संच वाटप
17. पावर टिलर
18. प्लॅस्टिक मल्चिंग
19. मधुमक्षिका वसाहत
20. पॅक हाऊस
21. कांदा चाळ
22.  प्राथमिक प्रक्रिया केंद्र
23. फिरते विक्री केंद्र
24. पाईप
25. पेरणी अर्ज
26. रीज फरो प्लांटर
27. रोटाव्हेटर
28. बहुपिक मळणी यंत्र

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रे Documents for MahaDBT Shetkari Yojana:-

1. शेतकऱ्यांचे आधार कार्ड
2. शेतकऱ्यांचे बँक पासबुक
3. जातीचा दाखला
4. योजने संदर्भात बिल
5. व इतर योजनेनुसार आवश्यक कागदपत्रे
6. पूर्व संमती पत्र

शेतकरी मित्रांनो MahaDBT Farmers Scheme अंतर्गत लाभ मिळण्याकरिता वरील सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे

महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आवश्यक बाबी:-

1. या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असायला पाहिजे.
2. या योजनेअंतर्गत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांकडे आधार संलग्न बँक खाते असायला पाहिजे.
3. योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
4. योजनेअंतर्गत लागण्याकरिता शेतकऱ्यांनी सुरुवातीला नोंदणी करावी नंतर लॉगिन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा.

✍🏻संकलन
नितीन एस  ढाकणे
8421577797
( कार्यकारी अध्यक्ष बीड जिल्हा :माहिती अधिकार महासंघ )