• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची मटक्यावर कारवाई अवैद्य धंदे वाल्यांचे धाबे दणाणले

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची मटक्यावर कारवाई अवैद्य धंदे वाल्यांचे धाबे दणाणले

◼️एकूण १ लाख ३८ हजार २४० रु मुद्देमाल ताब्यात घेत २१ जणांच्या विरुद्ध कारवाई केली.

सविस्तर वृत्त

आज सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार बीड शहरात बस स्टँड समोर राजधानी हॉटेल व यशराज हॉटेलच्या पाठीमागे तसेच धानोरा रोड येथे अवैध रित्या मटका चालू आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी सदरची माहिती माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलीस आमलदार यांनी दोन टीम तयार करून सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेशित केले त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी बीड शहरातील बस स्थानक येथे राजधानी हॉटेलच्या पाठीमागे 2:45 वाजता छापा मारून आठ इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कल्याण मटका जुगाराची साहित्य व नगदी रोख रक्कम असा एकूण 65 हजार 520 रुपयांचा व यशराज हॉटेल च्या पाठीमागे व धानोरा रोड येथे 15.10 छापा मारून त्या ठिकाणाहून 9 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी व कल्याण मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 72 हजार 710 रुपये असा जप्त करून बीड शहर येथे नऊ आरोपी विरुद्ध व शिवाजीनगर येथे बारा आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब बीड अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब बीड सहा पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली त्याचे पथकाथील पोलीस अमलदार बाबासाहेब बांगर बालाजी दराडे राजू वंजारे विकास चोपणे ,अनिल मंदे, दिलीप गीते, संजय टुले ,सचिन अहकारे यांनी केली आहे ,कारवाईत पंकज कुमावत यांच्या पथकाने नगदी रोख रकमेसह एकूण १ लाख ३८ हजार २४० रु मुद्देमाल ताब्यात घेत २१ जणांच्या विरुद्ध कारवाई केली.