• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

प्रभू रामचंद्र यांच्या मंदिर बांधकामासाठी आलेल्या उद्धव स्वामी यांच्या संस्थानाच्या जागेत होणार्‍या अतिक्रमण बाबत तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले

प्रभू रामचंद्र यांच्या मंदिर बांधकामासाठी आलेल्या उद्धव स्वामी यांच्या संस्थानाच्या जागेत होणार्‍या अतिक्रमण बाबत तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले

हनुमंत गव्हाणे : केज प्रतिनिधी

उद्धव स्वामी संस्थानच्या जागा ही अंबाजोगाई रोडवर लगत 18 एकर असून मोठ्या नेत्यांना हाताशी धरून व काही लोकांनी आपल्या जमिनीला चांगला भाव येण्यासाठी उद्धव स्वामी संस्थानच्या जागेतून रास्ता करून 30×50 च्या पुढे कब्जा मारला आहे. तरी आपण यावर तात्काळ कारवाई करावी अथवा तिथले वाढते अतिक्रमण करण्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्याची आदेश द्यावेत ही विनंती निवेदन द्वारे करण्यात आले या जागेचा इतिहास म्हणजे रामदास स्वामींचे शिष्य उद्धव स्वामी यांनी या जागेत संजीवन समाधी घेतली आहे. याच जागेवर आता भु-माफियाचे लक्ष असून आपण तात्काळ कारवाई करण्याचे द्यावे ही विनंती आज निवेदन द्वारे करण्यात आली यावेळी हे निवेदन नायब तहसीलदार  सचिन देशपांडे साहेब यांच्या कडे देण्यात आले यावेळी  हनुमंत साने, उपेंद्र कोकीळ, विशाल नाईकवाडे, ज्ञानेश्वर घुले, गोविंद नेहरकर, कृष्णा आंधळे,अभिप्राय मस्के, मिथुन गुंड,अविनाश काळे, संदेश नाईकवाडे, संदीप नेहरकर, सुमेध कोकीळ,नानासाहेब गुंड, भुजंग सुडके, रोहित कसबे,नवनाथ ढगे,गोविंद मुंडे, संजय सोनवणे,  अक्षय तट,दत्तप्रसाद पुरी, पवन अंधारे,लक्ष्मण जाधव, अमोल शिंदे,सोमनाथ राऊत, संजय सोनवणे,रामभाऊ शिंदे,सागर डिकुले,सचिन नेहरकर, अभिमान हांगे आदी जण  उपस्थितीत होते