• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व सहकार्यांनी केली 51 लाख 20 हजार रुपयांची धडाकेबाज कारवाई

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व सहकार्यांनी केली 51 लाख 20 हजार रुपयांची धडाकेबाज कारवाई

◼️नेहमीप्रमाणे पंकज कुमावत यांनी सतर्कपणे कारवाई करत मोठ्याप्रमाणात गुटखा केला हस्तगत

◼️सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र होत आहे कौतुक

◼️ बीड जिल्ह्याला पंकज कुमावत यांच्यासारख्या सच्चा अधिकाऱ्यांची गरज

सविस्तर वृत्त: नितीन ढाकणे

दिनांक 03/02/2023 रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमीनुसार दिनांक 04/02/2023 रोजी पहाटे ट्रक क्रमांक GJ 12 A Y 9425 यामध्ये गोवा गुटख्याचा माल बसवकल्याण येथे भरून तो सोलापूर ते बीड रोड ने मांजरसुंबा मार्गे बीड येथे जात आहे अशी माहिती मिळाली सदरची माहिती मिळताच आपल्या पथकातील सहकार्यांना सोबत घेऊन लागलीच पंकज कुमावत यांनी शोधमोहीम सुरू केली आणि याच शोधमोहीमेत पहाटे हे वाहन दिसताच ताब्यात घेतले

त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार यांना देऊन सदर वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी आज दिनांक 04/02/2023 रोजी 6:10 वाजता चौसाळा ते बीड जाणाऱ्या रोडवर उदंड वडगाव येथे रोडवर ट्रक थांबून सदर ट्रक चालक यांना नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव वजीर इम्रान गुल मोहम्मद व क्लिन्नर समीर सुलेमान नोतियार यांना ताब्यात घेऊन ताब्यात घेऊन सदरील ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये गोवा गुटख्याचे 40 मोठे बोध प्रत्येक बोधा मध्ये चार पोते असे एकूण 160 होते किमती 36 लाख रुपये व ट्रकची किंमत पंधरा लाख रुपये त्याचबरोबर दोन मोबाईल 20,000 रु असा एकूण किमती 51 लाख वीस हजार रुपयाचा माल ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नेकनूर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्याद वरून गुन्हा दाखल केला आहे
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनीव सहकार्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे