• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

के.एस.तुपसागर यांना महानिर्मितीच्या वतिने सेवानिवृत्तीबद्दल निरोप

के.एस.तुपसागर यांना महानिर्मितीच्या वतिने सेवानिवृत्तीबद्दल निरोप

मुख्य अभियंता भदाणे यांच्याहस्ते तुपसागर यांचा सपत्नीक सत्कार

परळी /प्रतिनिधी

परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील जलप्रक्रिया विभागातील कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के.एस.तुपसागर हे दि.31जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले.महानिर्मितीच्या वतिने निरोप देण्यात आला.तुपसागर यांनी केलेल्या निष्कलंक सेवेचा अनुभव सांगताना महानिर्मितीचे अधिकारी व सहकारी कर्मचारी भावुक झाले होते.यावेळी मुख्य अभियंता भदाणे यांच्याहस्ते के.एस.तुपसागर व सौ.संगिता तुपसागर यांचा सत्कार करण्यात आला.
महानिर्मिती कंपनीत 32 वर्षाची सेवा पुर्ण करुन के.एस.तुपसागर हे सेवानिवृत्त झाले.परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रात त्यांनी दीर्घकाळ सेवा करत विजनिर्मीती केंद्रास पर्यावरणाचा पुरस्कार मिळवुन दिला होता.परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील जलप्रक्रिया विभाग व प्रशासनाच्या वतिने आपल्या विभागात कार्यक्रम घेवुन तुपसागर यांना निरोप देण्यात आला.यावेळी अधिक्षक अभियंता संभाजी बुकतारे यांनी आपल्या भाषणात तुपसागर यांनी परळी येथे सेवा करताना सर्वांना सोबत घेत महानिर्मिती कंपनीची सेवा करताना काटकसर कशी करावी हे आपल्या आचरणातुन शिकविले.त्यांच्या या कार्याचा कर्मचार्याबरोबरच महानिर्मिती कंपनीला भविष्यात फायदा होईल असे सांगुन त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नागपूरचे सेवानिवृत्त अधिक्षक रसायनशास्त्रज्ञ डॉ. एच.डी.वासनिक ,उपमुख्य अभियंता एच.के.अवचार,अधिक्षक अभियंता आर.पी.रेड्डी,वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे,धनंजय कोकाटे,अरविंद येळे,जगन्नाथ देशमाने,सतीश मुंडे,भगवान साकसमुद्रे,कामगार नेते बी.एल.वडमारे,गोविंद नागरगोजे,केशव कुकडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन महेंद्र शिंदे यांनी आभार कल्याण अधिकारी दिलीप वंजारी यांनी मानले.