• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सोमेश पंवार यांची सायकल अमृत यात्रा परळीत होणार दाखल

परळी वैजनाथ / प्रतिनिधी
हिमाचल प्रदेश अमृत यात्रा अंतर्गत भारतातील प्रसिद्ध चार धाम द्वादश ज्योतिर्लिंग यात्रा उत्तराखंड, केदारनाथ, दिल्ली, उत्तर प्रदेश, काशी, अयोध्या, बिहार, झारखंड, श्रीशैल्यम, पश्चिम बंगाल, गंगासागर, ओडीसा, जगन्नाथ पुरी, तामिळनाडू ,रामेश्वरम, कर्नाटक व हम्पी इत्यादी 12/13 हजार किलोमीटर सायकल द्वारे हि यात्रा दिनांक 3 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यांमध्ये प्रवेश करत असून विशेषता ही आहे की ही सायकल यात्रा अत्यंत उत्साही युवा बद्रीनाथ धाम स्थित कुबेरदेवचे मुख्य पुजारी सोमेश पंवार यांची भारत भ्रमण तिसरी यात्रा आहे.एक हिंदू तरूण सोमेश पंवार यांची 12 ज्योतीर्लींग 4 धाम सायकल यात्रा दि.6 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी परळी वैद्यनाथ येथिल डॉ.सुरेशजी चौधरी यांच्या निवासस्थानी स्वागत व मुक्काम तसेच सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी यांच्या वतीने स्वागत तर दुसर्या दिवशी प्रभु वैद्यनाथांचे दर्शन घेऊन औंढा नागनाथ कडे रवाना होणार दि.20 ऑक्टोबर 2022 रोजी आईचे आशिर्वाद घेऊन बद्रीनाथ धाम येथुन सुरुवात करत दरकोस दरमुक्काम करत हि सोमेश पंवार यांची सायकल यात्रा सुरु असुन जिथे तिथे मान्यवरांच्या हस्ते स्वागत होताना दिसत आहे व दररोज प्रवास करताना नविन उर्जा निर्माण झाली असे वाटत असल्याचे मत प्रस्तुत प्रतिनिधी जवळ सोमेश पंवार यांनी व्यक्त केले.