• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

के.एस.तुपसागर यांच्या ज्ञान,चिकाटीमुळे महानिर्मितीस मोठा फायदा- पी.एन.भदाने

के.एस.तुपसागर यांच्या ज्ञान,चिकाटीमुळे महानिर्मितीस मोठा फायदा- पी.एन.भदाने

विविध क्षेत्रातीलमान्यवरांनी तुपसागर यांना सेवानिवृत्ती व वाढदिवसानिमित्त गौरविले

परळी (प्रतिनिधी)

औष्णीक वीज निर्मिती केंद्रात कार्यकारी रसायनशास्त्र,जलप्रक्रिया विभागात के.एल.तुपसागर यांनी 32 वर्षांची सेवा केली असुन या विभागातील परिपूर्ण ज्ञान व चिकाटी यामुळे परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रास पुरस्कार प्राप्त झाला असुन त्यांच्या अविरत सेवेमुळे महानिर्मिती कंपनीला मोठा फायदा झाला असुन त्यांच्याकडून खुप काही शिकण्यासारखे असल्याचे प्रतिपादन परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता पी.एन.भदाने यांनी केले.
महानिर्मिती कंपनीत चंद्रपुरसह इतर ठिकाणी सेवा केल्यानंतर सेवेच्या 32 वर्षानंतर के.एल.तुपसागर हे परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रात कार्यकारी रसायनशास्त्र,जलप्रक्रिया विभागातून दि.31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले.सेवनिवृत्ती व वाढदिवसानिमित्त बुधवार दि.1 फेब्रुवारी रोजी तिरुपती मंगल कार्यालयात गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नागपूरचे सेवानिवृत्त अधिक्षक रसायनशास्त्रज्ञ नागपुरचे एच.डी.वासनिक म्हणाले की तूपसगर हे अभ्यासू व्यक्तिमत्व,उपमुख्य अभियंता एच.के.अवचार,अधिक्षक अभियंता बुक्तारे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी मंचावर अधिक्षक अभियंता आर.पी.रेड्डी,माजी आ.पृथ्वीराज साठे,राकाॕचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,बाळासाहेबाची शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी शिंदे,वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे,धनंजय कोकाटे,जगन्नाथ देशमाने,कामगार नेते बी.एल.वडमारे, कॉन्ट्रॅक्टर व असोशियनचे अध्यक्ष अगंद हाडबे अदी मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवस व सेवापुर्ती गौरव सोहळ्यात प्रसिध्द गायक बालासाहेब शेप यांनी गीते गाउन उपस्थितांचे मने जिंकली होती.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक संगिताताई तुपसागर यांनी केले.सुञसंचलन महेश मुंडे यांनी केले तर आभार इंजि.भगवान साकसमुद्रे यांनी मानले.
यावेळी राकाँ महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सोफिया नबंरदार तालुकाध्यक्षा शितल मुंडे,कोराडीचे कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ दिनकर लोहे,व्यवस्थापक एस.बी.डोंगरे,चैत्यन्य जाधव,सुनिल पवार,कार्यकारी अभियंता मदन पवार,महादेव वंजारे,जयवर्धन सुर्यवंशी,कुकडे, गोविंद नागरगोजे,कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ ए व्ही धर्माधिकारी,कार्यकारी अभियंता महादेव मुंडे,सौ.सविता अघाव,बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ.बी.यु.रोडे, महानिर्मीतील संघटना,पञकार व तुपसागर परिवारावर स्नेह असलेले सर्व कौटुंबिक अदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्य अभियंता पी.एन.भदाने यांनी तुपसागर यांनी केलेल्या सेवेवर प्रकाश टाकताना माझा व त्यांचा अनेकवेळा संपर्क आला.यातुन त्यांच्याकडील ज्ञानाची प्रचिती आली. अल्पकाळासाठी परळी येथे त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला.त्यांच्या कार्यामुळे परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रास पर्यावरणाचा पुरस्कार मिळाला.नौकरी करत असताना त्यांनी ज्ञान घेण्याचे काम बंद न करता शिक्षणातील अनेक पदव्या संपादन केल्या.या दरम्यान त्यांच्या धर्मपत्नी संगिता तुपसागर यांची मोलाची साथ लाभल्याचे सांगितले