• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी शहर डिजिटल बॅनर, फ्लेक्स मुक्त करून शहराचे विद्रुपीकरण थांबवा- राष्ट्रवादी काँग्रेसचे न.प.ला निवेदन

*परळी शहर डिजिटल बॅनर, फ्लेक्स मुक्त करून शहराचे विद्रुपीकरण थांबवा- राष्ट्रवादी काँग्रेसचे न.प.ला निवेदन*
परळी वैजनाथ, प्रतिनिधी….


परळी शहर डिजिटल बॅनर, फ्लेक्स मुक्त करून शहराचे विद्रुपीकरण थांबवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने न.प.ला निवेदन देऊन करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी व कार्यकर्त्यांनी नप प्रशासनाला हे निवेदन सादर केले आहे
परळी शहर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी प्रभु वैद्यनाथ ज्योर्तिलिंग असणारे शहर असुन देशभरातून भाविक तिर्थ यात्रेसाठी सतत येत असतात. मात्र परळी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून बॅनर व फ्लेक्स लावण्याची पध्दती पुर्णतः चुकीची झाली आहे. या बॅनर्स व फ्लेक्समुळे मुख्य रस्त्यावर, चौकात वाहन वर्दळीस त्रास होत होवून शहराचे विद्रुपीकरण होत आहे.
राज्याचे माजी मंत्री तथा परळीचे लोकप्रिय आ. धनंजय  मुंडे व गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांच्या सुचनेनुसार तसेच परळी शहरातील नागरीकांची, व्यापाऱ्यांची तीव्र भावना आहे की, परळी शहर डिजिटल बॅनर मुक्त व्हायला हवे. त्या अनुषंगाने डिजिटल बॅनर्स व फ्लेक्समुक्तीसाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी,अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष अल्ताफ पठाण व सहकारी उपस्थित होते.