• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लोकनेते प्रा. टी. पी. मुंडे (सर )यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू महाविद्यालय प्रजासत्ताक दिन साजरा

परळी वैजनाथ येथील जवाहरलाल नेहरू वरिष्ठ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहन वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकनेते प्रा. टी. पी. मुंडे (सर )यांच्या हस्ते आज दि 26 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाले.

दरम्यान या कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते नरहरी काकडे, महेश बँकेचे उपाध्यक्ष शिवरत्न काका मुंडे, प्रा अवस्थी सर, भीमराव मुंडे,परळी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय ढवळे ,ओमप्रकाश सारडा,अनिल मस्के, विनायक गडदे, बाबा शिंदे, रघुनाथ डोळस, नितीन शिंदे,विश्वनाथ देवकर, सुदाम लोखंडे ,इलियास भाई ,युवा नेते श्याम गडेकर , जम्मू भाई ,डॉ माणिक कांबळे सगीर भाई ,नागेश व्हावळे, युवा नेते नवनाथ शिरसागर ,अशोक कांबळे, किशोर जाधव ,शिवा बडे, सोमनाथ आघाव, चांद भाई, मुक्तार भाई ,नूरबानू खाल्ला,बद्दर भाई ,शेख बाबा, , संपादक आणि पत्रकार नितीन ढाकणे ,पत्रकार दिपक गित्ते प्रा. आदिनाथ नागरगोजे ,दीपक मुंडे,विनोद मानकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.