• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ बँकेला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या बीडच्या वैद्यनाथ बँकेला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.ही नोटीस २४जानेवारीला पाठवण्यात आली आहे.तसेच ३१ जानेवारीला कागदपत्रांसह हजर राहून खुलासा करावा असं सांगण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?

वैद्यानाथ बँकेकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शंभूमहादेव कारखाना गहाण होता. कारखान्याने वेळेत कर्ज परत न केल्याने कारखाना लिलावात काढण्यात आला. मात्र, या लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तींचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे सभासद सुभाष कारभारी निर्मळ रा. आर्य समाज मंदिराजवळ, परळी यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात 5 जानेवारी 2023 रोजी अर्ज देऊन गैरव्यवहराची चौकशी करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती. या तक्रार अर्जावरून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.