• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

शनिवारी विक्रम काळेंच्या प्रचारार्थ परळीत शिक्षक-प्राध्यापक मेळाव्याचे आयोजन

◼️शनिवारी विक्रम काळेंच्या प्रचारार्थ परळीत शिक्षक-प्राध्यापक मेळाव्याचे आयोजन

◼️शनिवारी विक्रम काळेंच्या प्रचारार्थ परळीत शिक्षक-प्राध्यापक मेळाव्याचे आयोजन

◼️शनिवारी विक्रम काळेंच्या प्रचारार्थ परळीत शिक्षक-प्राध्यापक मेळाव्याचे आयोजन

◼️माजी मंत्री आ. धनंजय मुंडे करणार डिजिटल पद्धतीने करणार सभेला संबोधित

◼️अपघातानंतर पहिलाच कार्यक्रम; काळे गुरुजींच्या विजयासाठी धनंजय मुंडे ऑनलाइन पद्धतीने होणार प्रचारात सहभागी!

परळी (दि. 24) –

महाविकास आघाडी व शिक्षक संघटनांचे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील अधिकृत उमेदवार माजी आ. विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. 28 रोजी परळी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक – प्राध्यापक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे अपघातानंतर प्रथमच एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

शनिवारी (दि. 28) रोजी परळी शहरातील आर्य वैश्य मंगल कार्यालय नेहरू चौक, येथे सकाळी 11.30 वा. या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, आ. धनंजय मुंडे हे दृक-श्राव्य माध्यमातून या प्रचार सभेला संबोधित करणार आहेत.

या मेळाव्यास ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय राज्य मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील, मा.आ.विक्रम काळे, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर आबा चव्हाण,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख,तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.अनिल जाधवसय्यद,शहराध्यक्ष सय्यद हनिफ बहादूर भाई,शिवसेनेचे तालुका प्रमुख (उ.बा.ठा.) व्यंकटेश शिंदे,रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रणजित देशमुख शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते,एम सी व्ही सी शिक्षक संघटनेचे एम.एल. देशमुख,प्रा. सुनील चव्हाण, उर्दू शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, अन्य विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आदी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान काळे गुरुजींच्या विजयासाठी अपघातानंतर प्रथमच धनंजय मुंडे हे एका प्रचार सभेत सहभागी होत असून, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ऑनलाइन पद्धतीने धनंजय मुंडे सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्येही कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

या मेळाव्यास महाविकास आघाडी व विविध शिक्षक संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तसेच शिक्षक व प्राध्यापक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.