• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कनेडीच्या राड्यात आमदार वैभव नाईकांनी थाेपटले दंड

कोकण प्रतिनिधी | पांडुरंग कुबळ 
कणकवलीतील कनेडी गावात मंगळवारी भाजप आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना पदाधिकाऱ्यांत राडा झाला हाेता. यावेळी शिवसेनेचे कुंभवडे गावचे सरपंच आप्पा तावडे हे जखमी झाले हाेते. सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याने आमदार वैभव नाईक हे संतापले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना थाेपविण्यासाठी दंड थाेपाटले मात्र माघी गणेश जयंतीच्या (Ganesh Jayanti) पार्श्वभुमीवर गावातील वातावरण तणावपुर्ण होऊ नये यासाठी वेळीच पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना राेखले