• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पत्रकारांसोबतची अरेरावी खपवून घेणार नाही : डी. टी. आंबेगावे

*पत्रकारांसोबतची अरेरावी खपवून घेणार नाही : डी. टी. आंबेगावे*

*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आक्रमक*

माणगाव : पत्रकारांसोबत कोणीही अरेरावी केलेली खपवून घेणार नाही असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. माणगाव तालुक्यातील पत्रकार प्रसाद गोरेगांवकर दिनांक १७ जानेवारी रोजी, २०२३ रोजी आंबर्ले येथील उत्खननाबाबत वृत्तसंकलन करण्याकरिता माहिती घेण्यास तलाठी कार्यालय लोणेरे येथे गेले असता मंडळ अधिकारी यांनी तलाठी यांना भेटण्यास सांगितले त्यानुसार तलाठी यांची भेट घेऊन माहिती विचारत असताना तलाठी श्री. कदम यांनी पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांना अरेतुरेची भाषा करत इंग्रजी सोड, हिंदी सोड, मराठी सोड मुद्यावर ये असे एकेरी भाषा वापरत अपमानीत केले आहे. पत्रकारांना अरेरावीची भाषा करून अपमानित केल्याबद्दल सदर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायदा (अधिनियम २०१७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, माणगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने प्रांत अधिकारी माणगाव यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.


याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे,  रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, महाड तालुका अध्यक्ष स्वप्निल धवन, माणगाव तालुका उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री, महाड तालुका सचिव समीर पवार, माणगाव तालुका सदस्य विवेक कारोलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांना अरेरावी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झाली नाही तर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.