• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

शिंदे गट राजकीय पक्षच नाही’, ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद ?

‘शिंदे गट राजकीय पक्षच नाही’, ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद ?
ND NEWS MAHARASHTRA | शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आलेली नाही. शिंदे गटाकडून तसं काहीही झालेलं नाही. म्हणून शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही”, असा जोरदार युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पाच वर्षात निवडणूक आयोगात सर्व पक्षाची प्रक्रिया सादर करावी लागते. त्याच पद्धतीची प्रक्रिया ठाकरे गटाकडून होते. म्हणून शिवसेना हा राजकीय पक्ष नाही. ज्यावेळेस पक्षाच्या बैठका बोलावलेल्या होत्या त्यावेळेस शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीला निघून गेले. पक्षाने बोलावलेल्या बैठकीत या आमदारांनी येणं अपेक्षित होतं. लोकशाही पद्धतीने त्यांनी आपलं मत मांडता आलं असतं. त्यांनी म्हणणं न मांडता पक्ष सोडला”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.