• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

‘तारीख पे तारीख’
ND NEWS | केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्हावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.
ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल यांनी आधी आपला युक्तिवाद सुरु केला.
त्यांनी जोरदार युक्तिवाद केला. जवळपास 1 तास 10 मी. सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी युक्तिवादासाठी उठले. पण निवडणूक आयोगाने त्यांना थांबवत ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होऊ द्या, असं सांगितलं. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांनी आज जोरदार युक्तिवाद केला. विशेष म्हणजे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सर्वात महत्त्वाचा ठरला. या दोन्ही ज्येष्ठ वकिलांच्या युक्तिवादानंतर शिंदे गटाचे मुख्य वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला. दोन्ही वकिलांनी प्रत्येकी पंधरा ते वीस मिनिटे युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही गटांना सोमवारी लेखी उत्तर द्या, अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.