• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

आंतरराष्ट्रीय स्केटर श्रद्धा गायकवाडच्या मदतीला धावले ॲड.माधव जाधव .!

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- शीतलकुमार रोडे
दुबई येथील स्केटिंग स्पर्धेसाठी पात्र झालेली परळीची कन्या कु.श्रद्धा रवींद्र गायकवाड रविवार दि.२९ जानेवारी २०२३ रोजी दुबईकडे प्रयाण करणार आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असणारा सुमारे एक लाख वीस हजारांचा खर्च जमवताना तीच्या कुटुंबाच्या नाकीनऊ आले आहेत.स्पर्धेसाठी दुबईला पाठवण्याकरिता श्रद्धाचे वडील व काका धडपड करत आहेत.
मात्र म्हणतात ना.. कर भला तो हो भला.. त्यानुसार भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव हे श्रद्धाच्या मदतीला धावले आणि यथाशक्ती त्यांनी श्रद्धाच्या आजीच्या हाती रोख 20000/- ( विस हजार रुपये )रक्कम दिली.
या प्रसंगी ,जयभारती प्रतिष्ठानचे संचालक जी.डी. थोरात, इंजिनियर परमेश्वर भिसे, ऍड.केंद्रे, मीरा कम्प्युटर्सचे संचालक बालाजी गायकवाड,संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव,मुक्तपत्रकार अनिरुद्ध जोशी, रवींद्र गायकवाड, बालासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.