• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पत्रकार सचिन भांडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने रक्तदान शिबीर

ByND NEWS INIDIA

Jan 20, 2023

*पत्रकार सचिन भांडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने रक्तदान शिबीर नी*

 

परळी : पत्रकार व गती मल्टीसर्व्हिसेसचे संचालक श्री.सचिन भांडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने दि.२९ जानेवारी रोजी वडसावित्री नगर येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

अपघातात होणारा अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी रक्तदानमुळे संकटातील व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात. मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हा विचार घेऊन परळी शहरातील प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने गती मल्टीसर्व्हिसेस,वडसावित्री नगर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सचिन भांडे हे नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात व ते संकट काळात नेहमी लोकांच्या मदतीला उभे असतात, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या या शिबिरात रक्तदान करण्यासाठी आजपर्यंत पन्नासपेक्षा अधिक रक्तदात्यांनी नाव नोंदणी केली आहे. शहरातील जास्तीत-जास्त नागरीकांनी या शिबिरात रक्तदान करावे असे आवाहन केंद्राचे प्रमुख रमेश मुंडिक (धारासूरकर), आयोजन प्रमुख संतोष रामभाऊ मैड,वैजनाथ बोकन,सुनीलराव देशमुख,पद्माकर भंडारे व मित्रपरिवार यांनी केले आहे.