• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

वंचित बहुजन आघाडीच्या परळी तालुका अध्यक्षपदी गौतम साळवे यांची निवड

वंचित बहुजन आघाडीच्या परळी तालुका अध्यक्षपदी गौतम साळवे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या परळी तालुका अध्यक्षपदी गौतम भाऊ साळवे यांची फेरनिवड करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली असून गौतम साळवे गेल्या पंधरा वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्याच कार्याची पावती म्हणून त्यांची ही फेर निवड करण्यात आली असून तर उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्ष शेख एजाज शेख हबीब राजू लक्ष्मण भुतके विजय वामन झिंजुर्डे बाळासाहेब जयराम किरवले बाळासाहेब घोबाळे सुभाष रामभाऊ रोडे शेख इनुस अमोल बनसोडे प्रदीप चांगदेव बनसोडे संतोष चांगदेव हावळे तर महासचिवपदी विशाल रावसाहेब जाधव व बळीराज लुलाजी डुमणे तर कोषाध्यक्षपदी लोभाजी जोंधळे तर सहकोशाअध्यक्षपदी वैजनाथ भाऊसाहेब पांचाळ तर संघटक पदी माणिक वैजनाथ बीगणे सिद्धार्थ भाऊराव आदमाने सहसंघटक संगपाल भगवान कसबे मच्छिंद्र मारुती मुंडे तर सचिव म्हणून राधाकिशन यादव शिंदे सहसचिव प्रकाश भगवान घनगाव नितीन गंगाधर रोडे फैजोद्दीन इब्राहिम कैलास देशमुख गंगाधर साधू धुमाळ तर सदस्य म्हणून विशाल ज्ञानोबा कसबे धम्मा महादेव पैठणे राहुल विश्वनाथ घनसावत नागनाथ नारायण कसबे कधीची निवड करण्यात आली त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहेत.