• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पीक विमा व इतर प्रश्नांना घेऊन किसान सभा मैदानात

ByND NEWS INIDIA

Jan 7, 2023

■पीक विमा व इतर प्रश्नांना घेऊन किसान सभा मैदानात

●जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन

बीड: शितलकुमार रोडे

बीड जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना २०२२ अतिवृष्टी अनुदान अद्याप वाटप झाला नाही व २०२२खरीप विमा वाटपात देखील ताफवती व पारदर्शकता नाही. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, पीक विमा मिळाला त्यांची बँक खाती होल्ड करणे.पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या प्रश्नावर किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवार दि ९ जानेवारी रोजी जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

शासन व पीक विमा कंपनीने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची चेष्टा केली असून जानेवारी महिना सुरू असून अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळलेले नाही.कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या उद्योगपतींच्या खात्याला होल्ड न लावता शेतकऱ्यांच्या अनुदान , पीक विमा मिळत असलेल्या खात्याला शासन,विमा कंपनी व बँका होल्ड करीत आहे यामधून शासनाची शेतकरी विरोधी भूमिका स्पष्ट होत आहे.कृषी पंपाला योग्य दाबाने सलग 8 तास वीज पुरवठा देण्यात यावा.सोयाबीन व कापूस याचे दर कमी होण्यास कारणीभूत ठरलेले आयात धोरण,कापसू पिकावर कमी केलेले आयात शुल्क हे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचे ठरत असल्याने सर्व शेती मालास योग्य हमीभाव द्यावा यासह इतर मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभा बीड च्या वतीने सोमवार दि ९ जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. एड. अजय बुरांडे, सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे,कॉ. काशीराम शिरसाठ,कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ.जगदीश फरताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.