• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नाथ्रा येथे नायब तहसीलदार बाबुराव रूपनर यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान

ByND NEWS INIDIA

Jan 8, 2023

नाथ्रा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित 6 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात वितरण

ND NEWS MAHARASHTRA |

कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना नाथ्रा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित 6 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात उत्कृष्ठ कार्याबद्दल समाजभूषण’ पुरस्कार प्रदान कारण्यात आला. श्री. रूपनर यांना समाजभूषण’ पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करून त्यांच्या कार्यास बळ देण्याच्या विधायक उद्देशाने कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षीच हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांचे प्रशासनातील कार्य उल्लेखनीय आहे. काळ वेळेचे भान न ठेवता शब्दशः २४ तास नागरीकांसाठी आणि प्रशासनासाठी तयार असणारी माणसं आहेत. अशी त्याची ओळख आहे नागरीकांच्या अडीअडचणी समजून घेणे व त्यांचे समाधान करणे. जागेवरच तक्रारींचे निरसन करणे व खऱ्या व गरजू लोकांना न्याय मिळवून देणे. तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात, अगदी सामान्य माणसांची ओळख असल्याने प्रत्येकजण साध्या कामासाठीही थेट त्यांनाच फोन करतात. विशेष म्हणजे त्यांचा फोन एकही मिनीट बंद नसतो. 24 तास फोन चालू ठेवून वेळोवेळी सर्वांच्या मदतीला धावून येणारे व्यक्तीतमत्व म्हणून ओळख आहे. शासकीय सेवेतील बहुसंख्य अपंग कर्मचारी, अधिकारी हे शासनाकडून सवलती मिळाव्यात म्हणून प्रयत्न करतात. पण बाबुराव रुपनर यांनी अपंग अधिकारी कर्मचारी यांना मिळणाऱ्या सवलती, विशेष सूट, सवलत नाकारली आहे. कोरोनाच्या काळात असंख्य गोर-गरीबांना व सर्वसामान्यांना मदतिचा हात दिला आहे. कोरोनाच्या कोरोना काळात ही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. सामाजिक बाधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे सर्वत्र ख्याती आहे. यापूर्वी ही त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे याआधी बऱ्याच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झालेले आहेत. त्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा “समाजभूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्रीनाथ सेवा मंडळाच्या वतीने अनेक वेगगवेळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात,त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील मराठी साहित्यकांसाठी मंडळाच्या वतीने अध्यक्ष डॉ.ए.घ.मुंडे व सचिव डॉ.संतोष मुंडे यांनी 6 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नाथरा येथे आयोजित केले होते,या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ए.घ.मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे मॅडम,पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक सौ.कराड मॅडम, सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे सचिव डॉ.संतोष मुंडे,सरपंच सुदंर गिते तसेच युवानेते नंदागौळचे ग्रामपंचायत सदस्य सचिन गित्ते यांच्यासह नागरिक व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.