• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

खाजगीकरण विरोधात वीज कर्मचारी संप संपाबाबत मेस्मा कायदा अंतर्गत कारवाईचा इशारा

खाजगीकरण विरोधात वीज कर्मचारी संप संपाबाबत मेस्मा कायदा अंतर्गत कारवाईचा इशारा

ND NEWS MAHARASHTRA : महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्या, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या व महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्या. या तीनही कंपनीतील कार्यरत म. रा. वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विदयुत कर्मचारी संघटन या समितीने बुधवार दि. ०४ रोजी मध्यरात्री पासून खाजगीकरण विरोधात ७२ तासांचा तीन दिवसीय संप पुकारला असून या बाबत वीज निर्मिती व वितरण ही अत्यावश्यक सेवेत येत असल्या कारणाने महाराष्ट्र शासन यांच्या राजपत्रानुसार महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम, २०१७ ( मेस्मा ) अन्वये संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे या अनुषंगाने परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्र, परळी  येथील सर्व कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांना महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. MESMA-2022/CR.475/Energy-5 दिनांक ०३.०१.२०२३ अन्वये महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मती कंपनी मर्यादित ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने सार्वजनिक हितास्तव संप करण्यास प्रतिबंधीत करण्यात येत आहे असल्याबाबत सूचना मुख्य अभियंता यांनी दिली आहे.