• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

“अजित पवार तात्काळ राजीनामा द्या”, भाजप नेत्याची मागणी ?

ByND NEWS INIDIA

Dec 31, 2022

“अजित पवार तात्काळ राजीनामा द्या”, भाजप नेत्याची मागणी ?

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्षेप घेतला आहे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार यांनी केली आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्षेप घेतला आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार म्हणतात की, ‘छ्त्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते…’ त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी तात्काळ विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तुषार भोसले यां केली आहे.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजित पवार यांना नाही, त्यांनी राजिनामा द्याला, अशी मागणी त्यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत असं बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी राजीनामा द्यावा, असं ते म्हणाले.
अजित पवार यांचे 14 मे 2019 चे ट्विट भोसले यांनी दाखवले. अजित पवार 2019 पर्यंत संभाजी महाराज यांना धर्मवीर मानायला तयार होते. मात्र आता 2022 मध्ये कशी त्यांना उपरती आली ?, असा सवाल त्यांनी केलाय