• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ND NEWS I : परळी –

राख वाहतुकीसाठी गेटपास देण्यासाठी खाजगी इसमाच्या मार्फत ८० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील येथील उप कार्यकारी अभियंत्यावर बीड एसीबीने सोमवारी (दि.२६) दुपारी कारवाई केली. सदरील उपअभियंत्यासह खाजगी व्यक्तीवर लाचखोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनिल रामदास वाघ (वय ३६, उपकार्यकारी अभियंता, परळी थर्मल पॉवर स्टेशन) व खाजगी इसम आदिनाथ आश्रुबा खाडे (वय 36 रा. शिवाजी नगर, परळी जि. बीड) अशी लाचखोरांचे नाव आहे. परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील तक्रारदाराला औष्णिक विद्युत केंद्रातील राख वाहतुकीसाठी २० गेटपास देण्यासाठी अनिल वाघ याने प्रत्येकी प्रती गेटपास ४ हजार रूपये प्रमाणे एकूण ८० हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम आदिनाथ खाडे या खाजगी व्यक्तीकडे देण्यास सांगितली. सदर तक्रारीवरून बीड एसीबीने सापळा रचून ८० हजार रुपये स्वीकारताना आदिनाथ खाडे याला रंगेहाथ पकडले. हि कारवाई बीड एसीबीने केली.