• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अनिल देशमुख यांना मोठा दिलासा, ‘ती’ याचिका फेटाळली, जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा…

अनिल देशमुख यांना मोठा दिलासा, ‘ती’ याचिका फेटाळली, जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा…
 उद्या त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

ND NEWS I:राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय. अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्याबाबत सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआयची ही याचिका मुंबई हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय.
सीबीआयची याचिका फेटाळली
अनिल देशमुख यांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
सीबीआयच्या या याचिकेला अनिल देशमुखांतर्फे अॅड. अनिकेत निकम यांनी विरोध केला. अनिल देशमुखांना जामीन मिळण्याच्या मुद्द्यावर त्यांनी बाजू मांडली आज अखेर सीबीआयचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. त्यामुळे देशमुखांना दिलासा मिळाला आहे.
जामीन कधी मिळणार ?
अनिल देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशमुख जेलबाहेर येतील. उद्या त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.