• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

संपादक बालासाहेब फड स्व.सुंदराबाई मुरलीधर आंधळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

संपादक बालासाहेब फड स्व.सुंदराबाई मुरलीधर आंधळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी : नाशिक येथे वंजारी समाजाच्या पहिल्या साहित्य संमेलनात स्व. सुंदराबाई मुरलीधर आंधळे राज्यस्तरिय समाज भुषण पुरस्कार- 2022 दैनिक सोमेश्वर साथीचे मुख्य संपादक बालासाहेब फड यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. फड यांना ग्रामीण साहित्यिका सुंदरबाई आंधळे हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित वंजारी समाजाचे पहिले एक दिवशीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे दि. 25 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाले. या साहित्य संमेलनात संपादक बालासाहेब फड यांना
संमेलनाध्यक्ष प्रा. वा.ना. आंधळे, बाबारावजी मुसळे, विदर्भ रत्न प्रशांतजी आंधळे, ह. भ. प. तुळशीराम महाराज गुट्टे, बुधाजीराव पानसरे उद्योगपती नाशिक, संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ गणेश खाडे, काकासाहेब खंबाळकर जेष्ठ विचारवंत, बबनराजी खाडे गुजरात, मारोतीराव उगले, डॉ विजय दहिफळे, डॉ लक्षराज सानप, डॉ. प्रीतम ताई मुंडे यांच्या सासुबाई कांचनताई खाडे, चंद्रभान नागरे, डॉ.मजुषा दराडे जळगाव, जेष्ठ साहित्यिका सिंधुताई दहिफळे आदि मान्यवरांच्या हस्ते रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे ग्रामीण साहित्यिका सुंदरबाई आंधळे राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले.