• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

‘अजित पवार यांची राष्ट्रवादीत घुसमट, आमच्यासोबत आले तर…’, शिंदे गटाकडून खुली ऑफर

‘अजित पवार यांची राष्ट्रवादीत घुसमट, आमच्यासोबत आले तर…’, शिंदे गटाकडून खुली ऑफर

शिंदे गटातील एका मंत्र्याने थेट अजित पवार यांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नुकतंच पत्रकारांवर भडकले होते. कारण पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्याविषयी एक प्रश्न विचारला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभेत निलंबित करण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर भडकले. ‘मी दुधखुळा नाही. विरोधी पक्षनेत्याचं काम काय असतं ते मला कळतं’, असं अजित पवार म्हणाले होते. दुसरीकडे अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीतीलही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटातील एका मंत्र्याने थेट अजित पवार यांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय