• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे शनिवारपासून परळीत आमरण उपोषण – अध्यक्ष सुधीर फड

प्रकल्पग्रस्तांना सेवेत कायम करावे, 45 वर्षावरील प्रकल्पग्रस्तांचा भत्ता वाढवून द्यावा आदी मागण्यांसाठी

महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे शनिवारपासून परळीत आमरण उपोषण – अध्यक्ष सुधीर फड

परळी वैजनाथ दि.
औष्णिक वीज निर्मिती केंद्रात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना सेवेत कायम करावे, 45 वर्षावरील प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता 30 हजार रुपये करावा या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीच्यावतीने शनिवार दिनांक 24 डिसेंबरपासून परळी वैजनाथमध्ये आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुधीर फड, सचिव गोविंद महाराज मुंडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. निवड करण्यात आली आहे. दरम्यान या उपोषणामध्ये जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांनी सहभागी होऊन एकी दाखवुन द्यावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.
यासंबंधी उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पासाठी जमिनी घेताना प्रशासनाने जमिनीच्या बदल्यात कुटुंबातील एकास कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे लेखी दिलेले आहे. परंतु मागील दहा वर्षात नियमांमध्ये अनेक बदल करून प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला आहे. तीन वर्ष वगळता मागील दहा वर्षात पदभरती केली नाही. त्यातही जाती प्रवर्ग आणि इतर आरक्षणामुळे प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला अतिशय कमी जागा आल्या आहेत. इतरांनी काय करावे असा सवाल करून जमिनी संपादित करतानाच्या अटी व शर्तीनुसार प्रकल्पग्रस्तांना तातडीने कायम सेवेत सामावून घ्यावे, 45 वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांना कायम करणे शक्य नसेल तर त्यांचा निर्वाह भत्ता 30 हजार रुपये करावा, चंद्रपूर पाॅवर स्टेशन येथे ज्या प्रकल्पग्रस्तांवर गुन्हे दाखल करून अन्याय केला आहे ते गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांसाठी गेल्या दहा वर्षांपासून कृती समिती संघर्ष करीत आहे पण आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. त्यामुळे यावेळी निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला असुन शनिवार दिनांक 24 डिसेंबर 2022 पासुन परळी वैजनाथ येथील जुने औष्णिक वीज निर्मिती केंद्र कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

*एकीची ताकद दाखवण्याची गरज*
दरम्यान हे उपोषण सर्वच प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी आहे. त्यामुळे या निर्णायक उपोषणावेळी सर्वांनी एकी दाखवुन देण्याची गरज असुन सर्व प्रकल्पग्रस्तांनी उपोषणामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुधीर फड, सचिव गोविंद महाराज मुंडे, प्रविण मुंडे, उपाध्यक्ष केशव तिडके, सहसचिव भगतसिंग ठाकूर, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर चांगिरे, सल्लागार विजय पाळवदे, सदस्य सुंदर चाटे, गौतम रोडे, प्रदीप नागरगोजे, विलास मुंडे, गुलाब अजमिर शेख आदींनी केले आहे.