• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक  सर्वसाधारण सभा

_सभासदांना १०  टक्के लाभांश जाहीर

ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी

परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.

शहरातील अग्रगण्य पतसंस्था स्वा.वि.दा. सावरकर नागरी सहकारी पतंसस्थेने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे.शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात ठरवलेले ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे.पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात 38 कोटी 11लाख रूपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट गाठले असुन ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावरच ही वाटचाल आहे.असा विश्‍वास पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.

संस्थेच्या कार्यालयात आज अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी आहवाल व ताळेबंद सभेत सादर करण्यात आला. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2022 अखेर संस्थेची आथिर्क स्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी 38 कोटी 11लाख ,भागभांडवल 76 लाख,राखीव निधी 2 कोटी 84 लाख,कर्ज 29 कोटी 79 लाख ,गुंतवणूक 11 कोटी 18 लाख ,निव्वळ नफा 68 लाख 26 हजार आहे.

पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार,ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक यांचा विश्‍वास हेच पाठबळ आहे. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे, रंगनाथ सावजी,रवि मुळे,दशरथ होळकर, डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी  यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी,सभासद चारूदत्त करमाळकर, श्रीपाद पाठक , शरनम ताटे, कृष्णा शिंदे, गणेश साखरे,राठोड आर. पी.,राहुल रोडे व सर्व कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.