• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांची भेट पहा संपूर्ण माहिती ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांची भेट

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहा मिनिटं बंदद्वार चर्चा झाली. यावर बोलताना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक म्हणाले, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे काही पहिल्यांदा भेटलेले नाहीत. दिवाळीच्या कार्यक्रमात तसेच वेडात वीर दौडले सात या कार्यक्रमात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. या भेटीगाठी काही नवीन नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना राज ठाकरे हे भेटले असतील तर त्यात काहीही वावगं नाही.

यावर बोलताना प्रताप सरदेसाई म्हणाले, लोकांमध्ये बसून बोलणार नाहीत. विधिमंडळाचं अधिवेशन नागपुरात सुरू आहे. येथे मुख्यमंत्र्यांशी महापालिका निवडणुकीची चर्चा करायला कोणी येणार नाही.

मनसेप्रमुख राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांचा मोठा पक्ष आहे. किमयागार नेता म्हणून त्यांची देशात ओळख आहे. दोन मोठे नेते भेटतात, तेव्हा चहापानाचा कार्यक्रम होतो. नागपुरातील ऑरेंज ज्युस, संत्राबर्फी अशा नावीन्यपूर्ण पदार्थांवर ताव मारला जातो, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.