• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

रा स पक्षाचे यु प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर परळीत भ्याड हल्ला

राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर

कण्हेरवाडीचे सरपंच आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जीवघेणा हल्ला

■ राजाभाऊ फड हे रासप नेते आणि विधान परिषदेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई तर राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत.

सविस्तर वृत्त : परळी प्रतिनिधी

रासपचे (RSP) युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्यावर परळी शहरात जीवघेणा हल्ला झाला आहे. यामध्ये त्यांचा भाचा आणि बॉडीगार्ड जखमी झाले असून राजाभाऊ फड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली असून या घटनेमुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे.
कन्हेरवाडीचे सरपंच राजाभाऊ फड यांच्यासह अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
यावेळी राजाभाऊ फड यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर तेथे असणाऱ्या खुर्च्यां देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मात्र ही घटना नेमकी का घडली? याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, राजाभाऊ फड हे रासप नेते आणि विधान परिषदेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई तर राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत.