• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राजेभाऊ फड यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे कन्हेरवाडीकर सुखावले

ByND NEWS INIDIA

Dec 17, 2022

राजेभाऊ फड यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे कन्हेरवाडीकर सुखावले

परळी (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील कन्हेरवाडी येथील युवकांचे लाडके नेते आणि माजी सरपंच राजेभाऊ फड हे दिलेला शब्द पाळतात अशी त्यांची पंचक्रोशीत ख्याती आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी गावातील महर्षि वाल्मिकी मंदिर, आई जगदंबा मंदिर, वन गणपती मंदिर, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर अशा काही श्रध्दास्थानांचा आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी विविध कामांसाठी वैयक्तिक स्वरुपात आर्थिक निधीची जाहीर घोषणा केली होती. त्यामुळे तो निधी राजेभाऊ फड यांनी उपलब्ध करुन दिल्यामुळे सर्व मंदिराची कामे अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

त्यामुळे दिलेला कोणताही शब्द राजेभाऊ फड पाळतात, याचा गावकऱ्यांना अभिमान आणि विश्वास आहे. सामाजिक बांधिलकीतून लग्न, दवाखाना, प्रवास, राशन, साहित्य, गणवेश, रस्ते अशा विविध अडीअडचणींना सातत्याने मदत करणारे माजी सरपंच राजेभाऊ फड यांची तालुक्यासह जिल्हाभर मोठी ओळख आहे.

दरम्यान, प्रत्येक प्रश्नाचं एकचं उत्तर ते म्हणजे राजेभाऊ फड. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात कन्हेरवाडीचा कायापालट होत आहे. सरकारी निधीवर अवलंबून न राहाता कामांना प्राधान्य देऊन स्वखर्चाने कामे मार्गी लावणारे माजी सरपंच राजेभाऊ फड आमचे सहकारी असल्याचा अभिमान आहे, अशी भावना जेष्ठ नेते श्रीरामजी मुंडे यांच्यासह रामहरी फड, सुरेश फड, प्रविण फड, काशीनाथ मुंडे, मंगेश कराड, प्रकाश मुंडे, त्रिबंक मुंडे, सोमनाथ मुंडे, काशिनाथ मुंडे, गणेश मुंडे, ज्ञानेश्वर फड यांनी व्यक्त केली आहे.

…तर सोबत काही घेऊन जाता येत नाही – राजेभाऊ फड

एक तर ठेऊन जाता येतं, नाही तर देऊन जाता येतं. सोबत तर काहीचं घेऊन जाता येत नाही. त्यामुळे ठेऊन जाण्यापेक्षा देऊन जाणं माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, हा कानमंत्र नेहमी आपल्या बोलण्यातून देणारे माजी सरपंच राजेभाऊ फड यांना मंदिराचे काम पूर्ण होत असल्याचे समाधान वाटत आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.