• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने परळी वैजनाथ येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये आयोजन

ByND NEWS INIDIA

Dec 10, 2022

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने परळी वैजनाथ येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये आयोजन*

*६ व्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे ना – रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार*

परळी वैजनाथ (दि. ९ डिसेंबर-  प्रतिनिधी)  जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे नवीन वर्षाच्या फेब्रुवारी २०२३ महिन्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने ना. रामदास आठवले साहेब  ( केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय, नवी दिल्ली) यांच्या हस्ते
राज्यातील महिलांना  व पुरुषांना सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, विचारवंत, लेखक,धार्मिक,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे. ना आठवले यांच्या  ६ व्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळास उपस्थित संपन्न होणार आहे.  याकरिता राष्ट्रीय कार्यध्यक्ष – श्री. बाळासाहेब आडांगळे , प्रा. दशरथ रोडे यांनी निवेदन पत्र शासकीय विश्रामगृह कलानगर मुंबई येथे भेट घेऊन दिले.

ना. आठवले म्हणाले की, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने आयोजन केलेल्या ६ व्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळास असंख्य मान्यवरांच्या उपस्थित राहीन . डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात लोकसभा व राज्यसभा अधिवेशन सुरू होत असून लवकरच कार्यक्रमाची तारीख संघाच्या  वरिष्ठ पदाधिकारी यांना सांगितले. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्यास महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, तसेच नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीच्या सर्व वरिष्ठ पत्रकार , सभासदांचे  मराठवाड्यात प्रथमच पुरोगामी विचारांच्या महिलांना व पुरुषांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला कौतुकास्पद आहे .

ना. आठवले म्हणाले कि, विजय सुर्यवंशी यांनी घेतलेले सामाजिक कार्य हे  छत्रपती शिवाजी महाराज,. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर पुरोगामी विचारांचा प्रभाव पडला  आहे.

  कार्यक्रमाचे *राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष – विजय सुर्यवंशी* यांच्या अध्यक्षतेखाली  राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण होणार असून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ अंतर्गत राज्या पंचवीस समित्या स्थापन करण्यात आलेल्या  आहेत. राज्य पत्रकार व पत्रकारांच्या विविध समस्यांवर ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी एक देश पातळीवर पत्रकारांना सहकार्य करत आहोत. २५ डिसेंबर  रोजी मालेगाव येथे ६ वे अधिवेशन संपन्न होणार आहे. या अधिवेशनास राज्यातून संघाचे सभासद आणि वरिष्ठ पदाधिकारी सुध्दा उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मुंबई विभागाचे असंख्य पत्रकार निवेदन देतांना उपस्थित होते.

६ व्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण-२०२३ सोहळ्यास संघाचे औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, बुलढाणा, अकोला, जळगाव, धुळे, मालेगाव, तसेच विभागीय , जिल्हा , तालुका, शहर पत्रकार सभासद तसेच महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे,  असे अध्यक्षच्या परवानगीने आव्हान करण्यात आले आहे.