• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

प्राथमिक आरोग्य केंद्र वरध रामभरोसे

ByND NEWS INIDIA

Nov 21, 2022

प्राथमिक आरोग्य केंद्र वरध रामभरोसे

धिरज खेडेकर: यवतमाळ

राळेगाव तालुक्यातील वरध येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्रात डाॅक्टरांची नियुक्ती असतांना येथे नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नाही कारन या आरोग्य केंद्रात पंधरा ते वीस गावे जोडली आहे उपचार घ्यायचा असेल तर शेतकरी तसेच शेतमजूर यांना आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे लागत आहे अशातच सावरखेड येथील महिला जया अमोल हिवरकर यांना चक्कर येऊन त्या खाली पडल्या असता त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वरध येथे नेण्यात आले पण आरोग्य केंद्रात डाॅक्टरच उपस्थित नव्हते काही काळ आरोग्य केंद्रात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.नाईलाजाने त्यांना खाजगी डॉक्टरकडे जाऊन इलाज करावा लागला.या सर्व बाबीकडे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद चे सिओ यांनी लक्ष देऊन येथील डाॅक्टरांना तसेच कर्मचारी byयांना मुख्यालयी राहन्याचे आदेश द्यावे