• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची बीड येथे विटंबना

ByND NEWS INIDIA

Nov 2, 2022

पुतळा विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा : वीरशैव समाज व बस्वप्रेमी परळीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

परळी वैजनाथ

बीड येथे जगद्ज्योती थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराजांच्या  पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी वीरशैव समाज व बसव प्रेमी परळीच्या वतीने  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांना निवेदन देण्यात आले. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकारी परळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरात सोमवार दि. ३१ ऑक्टोंबर २०२२ रोजी  महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील ग्रील व कोनशिलेची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करुन नासधूस केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील वीरशैव समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. यापुर्वीही येथे असे प्रकार घडलेले आहेत यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार होत आहेत. थोर समाजसुधारक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा परिसरातील या प्रकारात आरोपी असलेल्या समाजकंटकांना त्वरित अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल या मागणीसाठी समस्त वीरशैव समाज परळी वैजनाथ तर्फे  निवेदन देण्यात आले आहे.