• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मी एकनाथ शिंदे बोलतोय…; मुख्यमंत्र्यांनी अनोखी शक्कल

ByND NEWS INIDIA

Oct 28, 2022

मी एकनाथ शिंदे बोलतोय…; मुख्यमंत्र्यांनी अनोखी शक्कल

✍️अशीच यंत्रणा वापरून भाजप हा पक्ष जगात एक नंबरचा पक्ष झाला होता.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आता अनोखी शक्कल लढवली असून शिंदे यांच्या या कृतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मात्र अस्वस्थ झाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वयंचलित कॉलिंग यंत्रणेद्वारे पक्षाची सदस्य नोंदणी सुरू केली आहे. या कॉलिंग यंत्रणेत स्वत: शिंदे यांच्याकडून नागरिकांना आवाहन केलं जात आहे. ‘जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी मी एक भक्कम पाऊल उचललं आहे. सुजलाम, सुखलाम महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हीही माझ्यासोबत सामील व्हा. सामील होण्यासाठी क्रमांक १ दाबा,’ असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे.

शिंदे यांच्या गटाकडून व्हॉईस कॉल करून शिवसैनिकांची फसवणूक करण्यात येत आहे. ९११७२४२४८२७५ या नंबरवरून आलेल्या व्हॉईस कॉलवर १ हा क्रमांक दाबायला सांगितला जात आहे. असं केल्यास मिंधे गटाला तुमचं समर्थन असल्याचा अर्थ होतो. अशीच यंत्रणा वापरून भाजप हा पक्ष जगात एक नंबरचा पक्ष झाला होता. त्यामुळे राज्यभरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या समर्थकांना सूचित करण्यात येत आहे की, वरील मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवा आणि व्हॉईस कॉलला कोणताही प्रतिसाद देऊ नका,’ अशा सूचना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्राच्या माध्यमातून दिल्या आहेत.