• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 कलेक्टरसाहेब, तुम्ही दारु पिता का? व्वा रे कृषीमंत्री..!

ByND NEWS INIDIA

Oct 27, 2022

 नुकसानीची पाहणी करायला गेलेले सत्तार म्हणतात, कलेक्टरसाहेब, तुम्ही दारु पिता का?

 अब्दुल सत्तारांचा प्रश्न आणि जिल्हाधिकाऱ्यांचे उत्तर

बीड :

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांचा बीड जिल्ह्यात दौऱ्यावर असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अब्दुल सत्तार यांनी थेट बीडमध्ये पाहणी दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का? असा प्रश्न विचारला. यामुळं सत्तार पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरुन टीका केली आहे. सत्तार यांच्या वक्तव्यानं थेट कृषीमंत्र्यांनाच शेतकऱ्यांच्या दु:खाचा विसर पडला का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अब्दुल सत्तारांचा प्रश्न आणि जिल्हाधिकाऱ्यांचे उत्तर

राज्यातील शेतकरी परतीच्या पावसानं संकटात सापडला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून ट्विटवर ट्रेंड देखील चालवला. एकीकडे आदित्य ठाकरे देखील शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत आहेत. मात्र, यावेळीच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं असंवेदनशीलपणा दाखवणारं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. अब्दुल सत्तार परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी करायला आल्यानंतर चक्क दारूच्या गप्पा मारताना समोर आलं आहे. अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारु घेता का ?, असं विचारलं. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कधी कधी थोडी घेतो, असं उत्तर दिलं आहे.