• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी – संगीताताई तूपसागर

ByND NEWS INIDIA

Oct 15, 2022

 

ND NEWS | परळी प्रतिनिधी

अतिवृषटीमुळे मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त आहे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी रा.काँ. महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष संगीताताई तुपसागर यांनी केली
अतिवृष्टी आणि काही ठिकाणी निर्माण झालेल्या महापूर परिस्थितीमुळे पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खाजगी पीक विमा कंपन्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या शासन व प्रशासन यांच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी रास्त मदती पासून वंचित राहत आहे. कापूस सारख्या पिकाचे भाव वाढलेले असतानाच सततच्या पावसामुळे शेतातील कापसाच्या वाती झाल्या आहेत, हाता तोंडाशी आलेले सोयाबिन वाहून जाताना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे. शेतकरी हैराण झाला आहे.

शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची आवश्यकता आहे.

बीड जिल्हातील प्रत्येक गावात पावसाने थैमान मांडले आहे, शेतकऱ्यांच्या कष्टाचं मोल या पावसाने वाहून नेले आहे. सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देऊन खचलेल्या शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे.

अनेक महसूल मंडळात सरसरी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे, नद्यांना अलेल्या पुरांमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, एन. डी. आर. एफ. च्या निकषात बसणारे नुकसान असल्याने तात्काळ मदत मिळालीच पाहिजे यासाठी मा.धनंजय मुंडे साहेबांच्या मार्गर्शनाखाली शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.