• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सिद्धेश्वर नगर येथे मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे डॉ.संतोष मुंडेच्या हस्ते उद्घाटन

ByND NEWS INIDIA

Oct 16, 2022

शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची तपासणी

ND NEWS| परळी वैजनाथ

सिद्धेश्वर नगर येथे मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कान,नाक, घसा तज्ञ डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते झाले. परिसरातील नागरिकांनी यां शिबिरासा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी 108 नेत्र व 92 दंत तपासणी करण्यात आली.

शहरातील स्वराज्य चौक सिद्धेश्वर नगर येथे यशदायिनी प्रतिष्ठान आयोजित मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 वेळेत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे शहरातील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ श्रीनाथ हॉस्पिटल तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी दतचिकित्सक डॉ. शुभम लाहोटी, डॉ. पवन सावंत, नेत्रा चिकित्सक डॉ.अभिषेक धायगुडे, माजी प्राचार्य डी.डी. वाघमारे सर, पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे, विजय वाघमारे, डॉ. अलका गीते,राहुल कांदे मनोज गावडे, कृषी विभागाच्या टोम्पे मॅडम व इतर उपस्थितीत होते. डॉ. संतोष मुंडे व दीपक तांदळे यांनी उपस्थिती नागरिकांना मार्गदर्शन केले. समाज हिताला लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन करने गरजेचे आहे आणि निस्वार्थ सेवा करुन समाज विकासात मोठा योगदान द्यायला पाहिजे असे मत मान्यवरानी व्यक्त केले. या शिबीरात सहभागी झालेल्या नागरिकांची नेत्र व दंत तपासणी तज्ञ डॉक्टरांनी केली. तपासणीनंतर आवश्यकता असणा या व्यक्तींच्या दातांची सफाई, फिलिंग सुद्धा दंत शिबिरामध्ये दातांची स्वच्छता, दातांमध्ये फिलिंग करणे, दात काढणे, व तपासणीद्वारे योग्य माहिती देण्यात आली. तसेच शेकडो नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवत नेत्रतपासणी करून घेतली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी यशदायिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किशोर पवार, उपाध्यक्षा पल्लवीताई भोईटे, सचिव विश्वजीत मुंडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रा.किशोर पवार केले आहे. तर आभार विश्वजीत मुंडे यांनी मानले आहे.