• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना  २५२५/-सर्वाधिक भाव :बजरंग बाप्पा सोनवणे

ByND NEWS INIDIA

Oct 14, 2022

बोले तैसा चाले-शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे

सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना  २५२५/-सर्वाधिक भाव

हनुमंत गव्हाणे | केज/प्रतिनिधी

येडेश्वरी साखर कारखान्याने दर वर्षी प्रमाणे गाळप हंगाम २०२१-२२ मधिल गाळप झालेल्या ऊसास बीड जिल्ह्यात सर्वाधिक उच्चांकी भाव देण्याची परंपरा कायम राखत सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना २५२५/- सर्वाधिक भाव दिला. त्याबद्दल सर्व ऊस उत्पादक शेकऱ्यांच्या वतीने येडेश्वरी साखर कारखान्याचे आभार मानले जात आहे.

बीड जिल्ह्यात शेतकरी पुत्र यांच्या येडेश्वरी साखर कारखान्याची जोरदार चर्चा.शून्यातून विश्व उभारणारे व्यक्तिमत्त्व : बजरंग सोनवणे
यांचा येडेश्वरी साखर कारखाना देतोय शेतकऱ्यांना दिलासा.

बीड जिल्ह्याच्या राजकारण अन् उद्योग क्षेत्रात उतुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्व म्हणून येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांच्याकडे आज बघितलं जातं,परंतू बजरंग सोनवणे या नावापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे बजरंगबप्पा,शेतकरीपुत्र,कारखान्याचे चेअरमन इथपर्यंत आलेला आहे.हा प्रवास नक्कीच सोपा नाही.त्यासाठी संकटांच्या छाताडावर पाय देवून त्याला चितपट करण्याचं कौशल्य अंगी असावं लागतं.

हेच कौशल्य त्यांना त्यांच्या आई वडीलांकडून मिळत गेले. केज तालुक्यातील सारणी (आनंदगाव)या ठिकाणी त्यांचा जन्म झाला.लहानपणापासून अंगी नेतृत्वगुण असल्याने पुढे हाच मुलगा एका कारखान्याचा चेअरमन झाला.याच सगळ्या खडतर प्रवासाचा हा मागोवा.शेतकरी पुत्र म्हणून महाराष्ट्रभर ओळख.सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना २५२५/- सर्वाधिक भाव दिला. त्याबद्दल सर्व ऊस उत्पादक शेकऱ्यांच्या वतीने येडेश्वरी साखर कारखान्याचे आभार मानले जात आहे.