• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मालेवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या नातेवाईकांना एक लाखाची मदत

ByND NEWS INIDIA

Oct 13, 2022

परळी वैजनाथ
परळी तालुक्यातील मालेवाडी येथील शेतकरी बळीराम बदने यांनी दि.27 जुलै रोजी आत्महत्या केली होती.या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबियांना शासनाच्या वतिने नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.मालेवाडी येथील बळीराम भगवान बदने यांनी कर्जबाजारीपणास कंटाळुन दि.21 जुलै रोजी आत्महत्या केली होती आत्महत्या कुटूंबाचे वारसदार श्रीमती सुलभा बळीराम बदने याना आधार म्हणून नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांच्याहस्ते बुधवार दि.12 ऑक्टोबर रोजी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मालेवाडीचे सरपंच भुराज बदने तलाठी पंडित मयत शेतकर्याचे वडील भगवान बदने हे उपस्थित होते.