• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

व्यंकटेश्वरा (अंबासाखर) चा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉयरल अग्नी प्रदीपन समारंभ

ByND NEWS INIDIA

Oct 4, 2022

ह.भ.प. महादेव महाराज बोराडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सभासद शेतकऱ्याच्या हस्ते होणार बॉयलरचे अग्नी प्रदीपन

ND NEWS

|
माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (अंबासाखर) साखर कारखान्याचा श्री. मुंडे यांनी घोषित केल्याप्रमाणे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

संत तुकोबाराय पावनधाम औरंगपूरचे अध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बॉयरल अग्निप्रदीपन व्यंकटेश्वरा (अंबासाखर) येथे दसऱ्याच्या दिवशी दुपारी 3.11 वा. या शुभमुहूर्तावर समारंभ संपन्न होणार असून, बॉयलर पूजनाचा मान ऊस उत्पादक शेतकरी तथा सभासद श्रीनिवास जगताप (रा. मुडेगाव, ता. अंबाजोगाई) यांना सपत्नीक देण्यात येणार येणार आहे.

धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व्यंकटेश्वरा कम्पनीने अंबासाखर कारखाना मागच्या वर्षी चालवण्यासाठी भाडे तत्वावर घेतल्यानंतर 2021-22 या गळीत हंगामात अत्यंत कमी वेळेत सुमारे सव्वा दोन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले तसेच सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत एफ आर पी प्रमाणे बिलाचे देयकही अदा केले होते. त्यामुळे या भागातील अंबाजोगाई, परळी, केज, धारूर आदी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला होता.

त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांनी यावर्षी हा कारखाना अधिक क्षमतेने सुरू करणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार व्यंकटेश्वरा नव्या दमाने यंदाच्या गाळप हंगामासाठी सज्ज झाला असून, मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या अग्नी प्रदीपन संपन्न होत आहे, तरी या समारंभास सर्व संचालक मंडळ, सभासद्, ऊस उत्पादक शेतकरी यांसह परिसरातील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जंगम यांनी केले आहे.

___________________________

विजयादशमीचा उत्सव बळीराजाच्या आयुष्यात समृद्धी घेऊन यावा

जाती-पातींचे सीमोल्लंघन करून यावर्षी दसऱ्यानिमित्त आपुलकी, विश्वास व सामाजिक एकात्मतेचे सोने लुटू- धनंजय मुंडे

दसऱ्यानिमित्त माहूरगडावर कुलदैवत रेणुका देवीचे घेणार दर्शन

परळी (दि. 04) – विजयादशमी तथा दसरा हा सण असत्यावर सत्याचा विजय मिळवून आनंद साजरा करण्याचा व आनंदाचे सोने लुटण्याचा म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या दसऱ्याच्या निमित्ताने कष्टकरी बळीराजाच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात व त्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदावी अशी प्रार्थना आई जगदंबेला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला विजयादशमी तथा दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मागे कोविडच्या काळात आपण सर्वांनी अनेक चढ उतार पाहिले. आपल्या जवळचे अनेक जण आपल्याला सोडून गेले. अनेकांनी जीवन पणाला लावून लोकांची सेवा देखील केली. सेवधर्म पाळताना कोणी कुणाची जात पाहिली नाही, मानवता हा एकच धर्म त्याकाळी सर्वांनी जोपासला. त्या सर्वांचा सन्मान ठेऊन व त्यांचे स्मरण करून यावर्षी दसऱ्याच्या निमित्ताने जाती पातींचे सीमोल्लंघन करून आपसात स्नेह-आपुलकी, विश्वास व सामाजिक एकात्मतेचे सोने लुटू, असा मौलिक संदेशही धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

*धनंजय मुंडे जाणार माहूर गडावर*

दरम्यान उद्या विजयादशमी तथा दसऱ्याच्या निमित्ताने माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे नेहमीप्रमाणे त्यांचे कुलदैवत असलेल्या माहूरगडावर हेलिकॉप्टरने रेणुका मातेच्या दर्शनाला सकाळी 11 वा. जाणार आहेत, सकाळी माहूरगडावरील दर्शनानंतर दुपारी 3 वा. हेलिकॉप्टरने अंबाजोगाई येथे येऊन व्यंकटेश्वरा (अंबासाखर) साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निपदीपन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ते परळी शहरातील काळरात्री देवी मंदिर परिसरात परळीतील नागरिकांना व भाविकांना दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.