• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व प्रा.डॉ.विजयकुमार देशमुख यांचा वाढदिवस साजरा

ByND NEWS INIDIA

Oct 6, 2022

ND NEWS |

जेष्ठ नेते , बा.मुक्तो प्राध्यापक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा माजी नगरसेवक,मा.आमदार वामनराव देशमुख यांचे सुपुत्र प्रा.डॉ.विजयकुमार देशमुख यांचा वाढदिवस प्रा.माणिकराव मुंडे मित्रमंडळ तसेच मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला.
जिल्हा व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या. मराठा सेवा संघ प्रणित डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.एम एल देशमुख,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,प्रा. माणिकराव मुंडे, वैद्यनाथ देवस्थान कमिटीचे सचिव राजेश देशमुख, इंजि. संजय देशमुख , दत्तात्रेय ढवळे,औष्णिक विद्युत केंद्राचे लेखाधिकारी व्यवस्थापक सुनील पवार, दत्ता देशमुख, प्राध्यापक डॉक्टर रमेश राठोड प्राध्यापक डॉक्टर शेप सर प्राध्यापक सातपुते, श्री संतोष देशमुख माजी नगरसेवक दत्ता देशमुख भगवान साकसमुद्रे, शिवरत्न मुंडे ,ॲड.तांदळे ,सातपुते, धुमाळ,अश्विन मोगरकर,ॲड. रमेश साखरे, कार्यकारी अभियंता एस. व्ही माने , नरेश हालगे,सामत सेठ, पत्रकार बालाजी ढगे आदींची उपस्थिती होती.
“विजयकुमार देशमुख हे विद्यार्थीप्रिय आदर्श व्यक्तीमत्व असून विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत केलेले कार्य फार मोलाचे असून सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद चे प्रा.एम.एल.देशमुख यांनी केले.” सोमवार दि.3 ऑक्टोबर रोजी गुलमोहर या निवासस्थानी त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला .मोबाईल फोन, व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मिडीया वर तसेच प्रत्यक्ष भेटून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार व्यापारी व मित्रपरिवार आदींनी प्रा.विजयकुमार देशमुख सर यांना शुभेच्छा दिल्या.
आपण यापुढेही विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यास अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे प्रा. विजयकुमार देशमुख सर यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार निलेश देशमुख यांनी मानले.