• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

हिंगणी-आम्ला-कान्नापूर-बोधेगाव-सोनहीवरा या रस्त्याच्या 6 कोटी रुपयांच्या कामाचे धनंजय मुंडेंच्या हस्ते बोधेगाव येथे भूमिपूजन संपन्न

ByND NEWS INIDIA

Oct 3, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहा गणाचा धनंजय मुंडेंनी घेतला 4 तास मॅरेथॉन आढावा बैठक

प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व शिष्टमंडळांच्या मागण्या जाणून त्या सोडवण्याचे मुंडेंचे आश्वासन

ND NEWS:  MAHARASHTRA

परळी तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या हिंगणी-आम्ला-कान्नापूर-बोधेगाव-सोनहीवरा या 6 कोटी रुपयांच्या सिमेंट कोंक्रेट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या आज हस्ते व विविध मान्यवरांच्या हस्ते आज सकाळी बोधेगाव संपन्न झाला.

आ. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्पातून 6 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून, या कामाची निविदा प्रक्रिया व अन्य बाबी पूर्ण झाल्या आहेत. ग्रामीण भागातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा रस्ता मानला जातो. हिंगणी, आम्ला, कान्नापूर, बोधेगाव, सोनहिवरा या गावांतून जाणाऱ्या या रस्त्याचे दुरुस्ती करून यांतर्गत काँक्रीट रुंदीकरण करण्यात येणार असल्याने समस्त गावकऱ्यांच्या वतीने माऊली तात्या गडदे यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले.

यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह शिवाजी सिरसाट, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, माऊली तात्या गडदे, बोधेगावचे सरपंच श्रावण बनसोडे, सुधीर शिंदे, मिनानाथ शिंदे, शंकर शिंदे, लहूबापू लोंढे, संभाजी शिंदे, प्रल्हाद शिंदे, दिगंबर शिंदे, अरुण शिंदे, काशीनाथ रुपनर, भागवत रुपनर, शेख अबीर, मंजाहरी गडदे, देविदास बनसोडे, अभिमन्यू बनसोडे, दत्तात्रय गडदे, विठ्ठल गडदे, राज गडदे, व्यंटक गडदे, अंकुश शिंदे यांसह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

*मोहा गणाची गावनिहाय आढावा बैठक*

मोहा गणातील तडोळी, माळहिवरा, वाघाळा, वंजारवाडी व शेजारील तांडे, नागपिंप्री, करेवाडी, गोपाळपूर, गर्देवाडी, सरफराजपूर, कावळ्याची वाडी, बोधेगाव व मोहा या सर्व गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, गणातील ज्येष्ठ मंडळी व कार्यकर्त्यांची गावनिहाय आढावा बैठक धनंजय मुंडे यांनी घेतली.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, विष्णुपंत देशमुखझ भागवत बप्पा देशमुख, भानुदासअप्पा डिघोळे, माऊलीतात्या गडदे, यांसह प्रत्येक गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, ज्येष्ठ नेते, सरपंच/उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

तब्बल 4 तास चाललेल्या या आढावा बैठकीत श्री. मुंडे यांनी निवडणुकीत दिलेले शब्द पूर्ण करत असताना त्यातून उरलेली कामे, ग्रामस्थांच्या मागण्या, पाणी पुरवठ्याच्या योजना, वीज पुरवठा, ट्रान्सफॉर्मरची मागणी, शाळांच्या खोल्यांची मागणी, नद्यांवरील पुलांचे, विविध सामाजिक सभागृह बांधणे, ग्रामीण आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय सुविधा, वस्त्या-वाड्यांना जोडणारे रस्ते, पांदण रस्त्यांसह अन्य रस्त्यांच्या मागण्या यांसह विविध मागण्या व प्रश्न समजून घेत शक्य ते प्रश्न बैठकीतूनच संबंधितांना फोनवरून सूचना देऊन सोडविण्यासाठी नियोजन केले. त्याचप्रमाणे विविध ग्रामस्थांच्या बहुतांश मागण्या मान्य करून आगामी काही दिवसातच ही कामे हाती घेतली जातील व सुविधांचा पुरवठा केला जाईल, असे आश्वस्त केले.

धनंजय मुंडे यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसासह अन्य पिकांचीही माहिती घेतली असून ऊसाचे 100% गाळप केले जाईल यासाठीचे नियोजन आपण करत असल्याचे उत्पादकांना सांगितले.