• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा..| वाहतूक पोलीस बेपत्ता ? अवैध वाहतुकीच्या अड्ड्यांनी..नागरिक त्रस्त पोलीस प्रशासन मस्त !

ByND NEWS INIDIA

Oct 3, 2022

■राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ वंगे हॉस्पिटल, नेहरू चौक(तळ) बनले ट्रॅफिकची डोकेदुखी

■पोलिसांकडून दंडात्मक कारवाईच्या नावाखाली केवळ वसुलीच केली जाते का ?

ND NEWS |

सविस्तर वृत्त : परळीत वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा..| पोलीस प्रशासन बेपत्ता |अवैध वाहतुकीचा अड्डा..ने नागरिक त्रस्त डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रेल्वेउड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे.  परळीत आज दुपारी पुन्हा एकदा उडाण पुलावर वाहतुकीचा खेळ खोळंबा झाला अवजड वाहनाच्या ट्राफिक मुळे येथे सतत ट्राफिक जाम होते आहे .आज दुपारी उड्डाणपुलावर तब्बल एक ते दीड तास वाहतूक जागेवरच ठप्प झाली होती. तरीही सतत याकडे पोलीस मात्र दुर्लक्ष का करत आहेत हेच कळत नाही.

परळीतील उड्डाणपूल आतापर्यंत अवैध धंद्याचा अड्डा तसेच अवैध वाहतुकीसाठी व अपघातासाठी नेहमीच चर्चेत असतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ वंगे हॉस्पिटल वाहतूक व्यवस्था नेहमीच ठप्प असते त्यात मोकार फिरणाऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे बेधोकपणे चालणाऱ्या गाड्या बुलेटचा आवाज त्यातून येणारा अचानक बॉम्बस्फोट झाल्या सारखा आवाज मोकाटपणे फिरणाऱ्यांकडून गर्दीमध्ये वाजवण्यात येणारा
ठो,,,, ठो ,,,,,,असा आवाज यावर पोलिसांचे कसल्याच प्रकारे लक्ष नाही अशाप्रकारे नेमकं पोलीस प्रशासनच्या वतीने गाड्यांवर खतपाणी घालण्यात येत आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे
या सगळ्या घटनामूळे पोलिसांचे याकडे दुर्लक्ष हेच मुख्य कारण आहे.

केवळ पोलिसांकडून वसुली सुरू डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलावर वाहनाचा दंडात्मक कारवाईच्या नावाखाली टोळक्या टोळक्याने दिसणारे तत्पर पोलीस बांधव पण आज कुठं दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास फारच अडथळे निर्माण झाले होते. दसऱ्याच्या खरेदीसाठी  सहपरिवार निघालेल्या प्रवासी व नागरिकांना याचा मात्र सतत त्रास होत आहे. परळीकरांना उड्डाणपुलाच्या या त्रासातून कोण मुक्त करणार याकडे मात्र अनेक नागरिकांचे लक्ष लागले आहे.